संतप्त शेतकऱ्यांनी फासल सेंट्रल बँकेला काळं !

पिककर्जाच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याने शेतकरी आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं पिककर्जाच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडं शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी गेलेल्या शेतकरी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी सेंट्रल बँकेला काळं फासलं आहे.

मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला होता. बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे यानं एका शेतकऱ्याच्या पत्नीकडं कर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली होती. या प्रकरणी हिवसे व बँकेच्या शिपायाला अटक झाली आहे.

दरम्यान, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार असुन, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट माझा हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. तसेच या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करुन चालणार नाही, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कॉंग्रेसच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

तर पिककर्जाच्या बदल्यात बँक मॅनेजरने शेतक-याच्या पत्नीकडे केलेली शरीरसुखाची मागणी, ही बातमी एकूण तळपायाची आग मस्तकाला जात आहे. अशा सरकारचा कडेलोट केला पाहीजे, त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे. अशा शब्दात विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांना चांगलच फैलावर घेतल आहे.

bagdure

सबंधित बातम्या 

संतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे – धनंजय मुंडे

अशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे – अशोक चव्हाण

You might also like
Comments
Loading...