भाजप सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी उभारली ‘गाजरांची’ गुढी 

गंगापूर : भाजप सरकरकडून मागील तीन वर्षांच्या काळात सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडवण्यात आलेले नाहीत. दरवेळी केवळ आश्वासनांची गाजरे दिली जात असून सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गाजराची गुढी उभारत आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी कर्जमाफी तसेच शेतमालाला हमीभाव देण्यात सरकार अपयशी ठरले असून दरवेळी केवळ आश्वासनांची गाजरे दिली जात असल्याची टीका यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गाजराची गुढी उभारण्यात आली. यावेळी गंगापुरचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  ता. अध्यक्ष संपत रोडगे , ता. उपध्यक्ष मनीष नागपुरे, कामगार ता. अध्यक्ष कैलास काळे स्वभिमानी विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष परमेश्वर निकम आणि आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

शिक्षणमंत्र्यांच्या दारात काळी गुढी 

एका बाजूला गंगापूर येथे गाजराची गुढी उभारण्यात आली तर दुसरीकडे मुंबईमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवल्याचा निषेध म्हणून शिक्षक परिषदेच्या वतीने सिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यासमोर काळी गुढी उभारत निषेध नोंदवण्यात आला

You might also like
Comments
Loading...