Thursday - 19th May 2022 - 8:09 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न

by MHD News
Wednesday - 30th August 2017 - 12:16 AM
vasantdada sugar institute sangli शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न

file photo

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेकरारापोटी प्राप्त झालेल्या ६० कोटी रूपयाच्या अनामत रकमेतून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाना कामगार यांचीच थकीत देणी प्राधान्यक्रमाने दिली आहेत. त्यामुळे शेतकरी व कामगार पूर्णपणे समाधानी असताना विनाकारण शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना या दोन्ही घटकांच्या हिताला बाधा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली.

आर्थिक अरिष्टात सापडलेला वसंतदादा शेतकरी साखर कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर होता. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन हा साखर कारखाना दहा वर्षे भाडेकराराने मुंबई येथील श्री दत्त इंडिया कंपनीला चालविण्यास दिला आहे. हा भाडेकरार कायदेशीर बाबी तपासूनच केला आहे. या भाडेकरारानुसार श्री दत्त इंडिया कंपनीने जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६० कोटी रूपयांची अनामत दिली आहे. या भाडेकरारात ठरल्यानुसार या रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँक, ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाना कामगारांसह शासकीय देणी देण्यात आली आहेत. मात्र हा भाडेकरार संबंधित विषयातील तज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच झाला असतानाही शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेकडून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाना कामगार यांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही अनामत रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जमा असताना त्याबाबतचा निर्णय बँक प्रशासन अखत्यारित आहे.

शेतकरी व कामगार समाधानी असताना शेतकरी संघटनेने हस्तक्षेप करायची गरजच काय, असा प्रश्‍न उपस्थित करून जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने मनावर घेतले असते, तर ही संपूर्ण रक्कमच साखर कारखान्याच्या कर्जखात्याला वर्ग करून घेता आली असती. परंतु बँकेने शेतकरी व कामगार हिताला प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. या अनामत रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जापोटी केवळ ३० कोटी रूपये वर्ग करून घेतले आहेत, तर उर्वरित रकमेतून सन २०१५- १६ च्या ऊस बिलापोटी आठ कोटी ६२ लाख, सन २०१६- १७ च्या ऊस बिलापोटी चार कोटी ५५ लाख, कामगारांच्या थकीत पगारापोटी तीन कोटी ९० लाख व सांगली महापालिकेची थकित घरपट्टी १६ लाख ४२ हजार अशी एकूण ४७ कोटी ६२ लाख रूपयांची देणी दिली आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या देयकातून शेतकरी व कामगार पूर्णपणे समाधानी झाला आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटनेकडून विनाकारण आदळआपट केली जात असून साखर कारखाना चालविण्यातही जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा आरोपही दिलीप पाटील यांनी केला.

ताज्या बातम्या

शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
Editor Choice

निर्ढावलेलं सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय – सदाभाऊ खोत

sanjay raut शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
Politics

“…या संकटाशी सर्वांनाच एकत्रित मुकाबला करण्याची गरज आहे”, संजय राऊत यांचे वक्तव्य

Increase in the price of seed packets Farmers will have to pay so much money शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
Agriculture

बियाणांच्या पाकिटाच्या दरात वाढ; शेतकऱ्यांना मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

These nine ministers including the Chief Minister of Punjab are crorepatis शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
News

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह हे ‘नऊ’ मंत्री आहेत करोडपती!

Please login to join discussion

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

IPL 2022 young player in team well played who is your favourite शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
IPL 2022

IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?

Most Popular

Finally Hardik Patels resignation Congresss left hand शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
Editor Choice

…अखेर हार्दिक पटेलांचा राजीनामा, काँग्रेसचा सोडला हात!

IPL 2022 RCB vs GT Head to Head Stats and Records शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : बंगळूरूसाठी गुजरातचा ‘कठीण’ पेपर; पास झाले तर ठीक नाहीतर…!

When will the good days come Inflation hurts the masses Rupali Patil targets BJP शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
Editor Choice

“कधी येणार अच्छे दिन? महागाईने जनतेची होरपळ,” ; रुपाली पाटलांचा भाजपवर निशाणा

If we want to save Kashmiri Pandits Big statement of Farooq Abdullah शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
News

“काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर…”; फारूख अब्दुल्ला यांचं मोठं विधान

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA