राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार

Ajit_Navale

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. नाशिकमधून येत्या २० तारखेला मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा २७ तारखेला मंत्रालयावर येऊन धडकणार आहे. सरकारने कर्ज वसुली मोहीम राबवली आहे तसेच मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असा आरोप अजित नवले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केले आहेत. अहमदनगर येथील राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेत अजित नवले बोलत होते.

यावेळी नवले यांनी शेतकरी मोर्च्याबाबतची कल्पना दिली. आता, सरकारशी धोरणात्मक निर्णयाचा, न्यायालयीन लढाईचा आणि तिसरा टप्पा रस्त्यावरच्या लढाईचा असेल. असा इशारा देखील दिला. तसेच आता, संपूर्ण कर्जमुक्तीशिवाय मागे हटायचे नाही.असा निर्धार नवले यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान उद्योगांची करमाफी व कर्जमाफी मिळून सरकारने १८ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. त्यावर कोणी ओरडत नाही. त्यांना का कर्जमाफी म्हणून कोणी आक्षेप घेत नाही. मग, शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे का. एकाही उद्योजकाने आत्महत्या केली नाही. इकडे शेतकरी रोज मरत आहेत. शेतकरी आणि उद्योजक दोघेही भारताचे नागरिक आहेत. पण दोघांनाही वेगवेगळा न्याय का.? असा सवाल देखील त्यांनी यावेळी सरकारला विचारला.