राहुरी तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात

राजेंद्र साळवे. राहुरी – राहुरी तालुक्यातील वाबळेवाड़ी येथील शेतक-यांनी सरसकट कर्जमाफीसाठी पुन्हा आंदोलन  पुकारले आहे. त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात जाउन जन-जागृती करण्याचे काम सुरू करण्यात आल आहे. थकीत कर्जदारांना सरसकट कर्जमाफी करावी यासाठी येत्या 1 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे पुढील दिशा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना मान्य नसल्याने वाबळेवाड़ी येथे परीसरातील शेतक-यांनी विशेष ग्रामसभा घेउन शासनाचा निषेध केला.तसेच सहकारी सोसायटी चे सर्व संचालक आपल्या पदाचे राजीनामे देणार असल्याचे चेअरमन मोहन वाबळे  यांनी सांगीतले. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांनी व तालुक्यातील शेतक-यांनी या अंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन वाबळेवाड़ी येथील शेतक-यांनी केले आहे. या आंदोलनास शेतकऱ्यांचा पाठिंबा देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे