Share

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्या ‘हे’ काम, नाहीतर PM किसान योजनेचा 13 वा हफ्ता मिळणार नाही

टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे तेराव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. यावेळी केंद्र सरकारने हप्ता भरण्यासाठी थोडे कडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर या योजनेचा तेरावा हप्ता हवा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी (E-KYC) आणि जमिनीच्या नोंदी करून घ्या. कारण जर शेतकऱ्यांचे ई-केवायसी नसेल, तर शेतकऱ्यांना या योजनेच्या तेरावा हप्त्याच्या लाभ घेता येणार नाही. अशा परिस्थितीत सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर पर्यंत केली आहे. या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावे. अन्यथा शेतकऱ्यांना तेरावा हप्ता मिळण्यासाठी अडचण येऊ शकते.

पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. जे शेतकरी वेळेत ई-केवायसी करणार नाही, त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम 2000 रुपये मिळणार नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी हे काम लवकरात लवकर करावे यासाठी ई-मित्र केंद्र आणि सीएससी केंद्राला संपर्क साधण्याचे सूचनाही दिल्या जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ई-मित्र केंद्रामध्ये बँक खाते आधार कार्डाशी लिंक करण्याच्या प्रक्रियेसाठी म्हणजेच ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना पंधरा रुपये शुल्क भरावे लागेल. ई-केवायसी करणे हे फक्त या योजनेसाठीच नाही तर सरकारच्या बहुतांशी योजनेसाठी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून लाभार्थी यादीत आपले नाव तपासावे.

पी एम किसान योजना (PM Kisan Yojana) हेल्पलाईन नंबर 

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत देशभरात शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदणीची पडताळणी सुरू आहे. या योजनेसंबंधी शेतकऱ्यांना कुठलीही अडचण असल्यास शेतकरी हेल्पलाइन नंबर 155261 वर कॉल करून आपले प्रश्न विचारू शकतात. कारण हा हेल्पलाइन क्रमांक खास पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे तेराव्या …

पुढे वाचा

Agriculture

Join WhatsApp

Join Now