चळवळीतील कार्यकर्ते सरकारमधील नेते झाले की त्यांचा ‘स्वाभिमानी’ होणारच

अभिजीत दराडे  : शेतकरी संघटना आणि त्यात पडणारी फुट हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. अलीकडे तर ‘सामाजिक चळवळीतून राजकारणाकडे’ अशी संकल्पना चांगलीच रुळू लागली आहे,  मी तर म्हणेल राजकारणात येण्याचा हा उत्तम मार्ग असल्याचा समज निर्माण झाला आहे . खर तर सामाजिक चळवळ आणि राजकारण हे दोन्ही क्षेत्रे एकदम विरोधी . पण राजकारणाचा बदलता प्रवाह लक्षात घेता त्यातून सामाजिक जाणिवा कमी होत चालल्याचे स्पष्ट होते. तेव्हा अशात सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते राजकारणात आल्यावर चळवळीचे काय होणार, असा प्रश्न ओघाने पडणारच . याच जर अगदी बोलक उदाहरण घ्यायचं झाल तर देशात भ्रष्टाचार विरोधात रान उठून अरविंद केजरीवाल यांनी तत्कालीन सरकार ला जेरीस आणले होते ,त्या जन आंदोलनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून केजरीवाल यांना नेता झाल्याचा साक्षात्कार झाला ,मग पर्यायाने त्यांनी राजकिय पक्ष स्थापन करण्याची भावना बोलून सुधा दाखवली . त्यावेळी अनेक जाणत्या जेष्ठ लोकांनी त्यांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुधा केला पण सामाजिक चळवळीतून राजकारणात येण्याची दिवा स्वप्न घेऊन बसलेल्या केजरीवालानी आम आदमी पक्ष काढलाच . मग नंतर सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते राजकारणात आल्यावर काय होते याचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे .

anna hajare & keju

शेतकरी चळवळीला फुटीची परंपरा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होणारी संघटना म्हणजे ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ अशी या शेतकरी संघटनेची ओळख झाली आहे . तस पाहायला गेल तर स्वाभिमानी सुद्धा फुटीतूनच उभी राहिलेली संघटना राजू शेट्टी यांनी शरद जोशी यांच्याशी फारकत घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी केली . संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अल्पावधीतच लोकप्रिय झाली त्यामुळे संघटनेमागे शेतकऱ्यांची मोठी ताकद उभी राहिली . याच लोकप्रियतेच्या जोरावर संस्थापक राजू शेट्टी आधी आमदार आणि नंतर आता खासदार म्हणून निवडून आले . राजू शेट्टी सभागृहात आणि त्यांचे जिगरी मित्र आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कणा असलेले सदाभाऊ खोत रस्त्यावर असा संघटनेचा झंजावात सुरु होता.

Sharad_Joshi_

‘सदाभाऊ सदाभाऊ धुमधडाका’ ह्या घोषणांचा रस्त्यापासून तुरुंगापर्यंतचा प्रवास सुरूच होता  . पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनसोबत ही संघटना महाआघाडीत सहभागी झाली. या निवडणुकीनंतर राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार सत्तेत आले. या सरकारमध्ये सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदी घेण्यात आले. परंतु अलीकडे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात विसंवाद निर्माण झाल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे. यातून पुन्हा एकदा शेतकरी संघटनेत फूट पडणार का, हाही प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे. खर तर भाजप सरकार आल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येतील , आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कठोर परिश्रमाच चीज होईल अस राजू शेट्टी यांना वाटत होत . पण भाजप सरकारचे शेतीविषयी धोरणे पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक जुलमी आहेत . परंतु शेट्टी यांच्या हेतूच्या झाल अगदी उलट त्यामुळे राजू शेट्टी यांची कोंडी झाली आहे .

raju shetti & sadabhau

पूर्वीच्या सरकारच्या विरोधात जशे शेट्टी रस्त्यावर असायचे तसे आता दिसत नाहीत म्हणून ‘आमचा राजू हरवला’ अस म्हणत राजू शेट्टीवर टीका होत होती . त्यात त्यांच्याच संघटनेच्या सदाभाऊ यांच्याकडे कृषिराज्यमंत्रीपद असतानाही ते शेतक-यांची बाजू घेण्याऐवजी सरकारची बाजू घ्यायला लागले. अर्थात त्यांच्यातला शेतकरी नेता आता मंत्रीपदाच्या ओझ्याखाली दबला गेला. अशात सदाभाऊंचे चिरंजीव सागर यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यास शेट्टी यांचा विरोध होता.सदाभाऊ घराणेशाही आणतात, असा त्यांचा आक्षेप होता. सागर यांच्या प्रचारालाही ते गेले नाहीत. सागर यांचा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. आणि इथूनच राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात दरी निर्माण झाली . या निवडणुकीनंतर सदाभाऊ खोत यांनी “राजू शेट्टी यांनी आपले तत्व आल्याकडे ठेवावे” अशी टोकाची भूमिका घेतली अन खऱ्या वादाला तोंड फुटले. कोल्हापूरच्या आंदोलनात सदाभाऊ फक्त व्यासपीठावर हजर झाले. तिथेही त्यांनी भाषण केले ते राजू शेट्टी यांच्यावर टीका करणारे होते. मंत्री असणा-या नेत्याने हाती तलवार घेण्याची भाषा करावी, हे अतिच झाले. शेट्टी यांनी त्यांच्या बगलबच्यांचा बंदोबस्त न केल्यास त्यांचा बंदोबस्त स्वत:च करण्याचा इशारा ते द्यायला लागले. मुख्यमंत्र्यांच्या सांगलीतील कार्यक्रमात स्वाभिमानीचे कार्यकर्ते सदाभाऊंच्या उपस्थितीत गोंधळ घालत असताना दुसरीकडे राजू शेट्टी यांनी मात्र शिवसेनेच्या शेतकरी अधिवेशनाला हजेरी लावून सरकारवर टीकेची तोफ डागली.

devendra fadanvis & sadabhau

शेट्टी यांनी सरकारची कोंडी करायची आणि सदाभाऊंनी सरकारची बाजू मांडायची, या परस्परविरोधी भूमिकांमुळे संघटनेच्या दोन नेत्यांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडे सातत्याने सदाभाऊंच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत आहे. पाशा पटेल हे शेतकरी चळवळीतील एक नेते भाजपसोबत आहेत. पाशा पटेल यांना भाजपला न्याय देता येत नाही. तर सदाभाऊ याचं काय होणार हे नव्याने सांगायला नको सदाभाऊ यांना भाजपमध्ये आणून शेट्टी यांना शह देण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा भाजप नेत्यांचा हेतू आहे.  माजी खासदार शरद जोशी यांच्यानंतर भाजपकडे शेतकरी नेतृत्व भरून काढणारे प्रभावी नेतृत्व नाही. पाशा पटेल यांच्यासारखा अभ्यासू नेत्याचा उपयोग करून घेतला जात नाही. सदाभाऊंना पायघडय़ा घातल्या जात आहेत. परंतु पुण्यात २१ जुलै ला प्रा.पोफळे , रविकांत तुपकर , दशरथ सावंत , सतीश काकडे यांच्या समितीला सदाभाऊ खोत यांनी आपण संघटनेशी द्रोह न केल्याचा दावा केलाय पण तत्पूर्वी कार्यकर्त्यांशी बोलताना “या पुढे झेंडा ही आपला , दांडा ही आपला अन दोरीही आपली” अस बोलून सदाभाऊ यांनी नवीन संघटना स्थापनेचे संकेत दिले आहेत . आता जरी सदाभाऊ हे संघटनेत राहतील की नाही याचा चेंडू राजू शेट्टी यांच्या कोर्टात गेला असला तरी  एकंदर या घडामोडींच्या निमित्ताने शेतकरी संघटनेतील फुटीचे वादळ पुन्हा एकदा समोर आले आहे.

 Loading…
Loading...