शेतकऱ्यांचंं विराट वादळ आझाद मैदानात दाखल ; थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांना भेटणार

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी काढलेला लोकसंघर्ष मोर्चा आता मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचला आहे. हजारोंच्या संख्येने पहाटेच हा मोर्चा निघालायं. एकाच दिशेने वाहतूक सुरू असल्याने सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी टळली आहे.

Rohan Deshmukh

थोड्याच वेळात एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटून मागण्यांवर चर्चा होणार आहे. मोर्चातील शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदेंनी सोमय्या मैदानात भेट घेतली. मुंबईत दिवसा होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता मोर्चेकरी सकाळी साडे चार वाजताच आझाद मैदानाकडे निघाले.

पोलिसांनी पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईकडे निघालेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मोर्चासाठी ठाण्याकडे येणाऱ्या वाहतूकीची एक मार्गिका खुली केलीय.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...