राज्यकर्त्यांच्या कर्जमाफीचे श्रेय घेण्याच्या घाईनेच गडबडी झाली; शिवसेनेची भाजपवर टीका

udhav thakrey

राज्य सरकारकडून देण्यात आलेली शेतकरी कर्जमाफी वेगवेगळ्या कारणांनी वादात सापड्ताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून विरोधकांकडून फडणवीस सरकारला टार्गेट केल जात आहे. आता सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील या कर्जमाफीचा समाचार घेण्यात आला आहे. ‘शेतकरी कर्जमाफी हा लाखो शेतक-यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असला तरी राज्यकर्त्यांसाठी तो श्रेयाचा झाला आहे. श्रेय आले की घाई येते आणि घाई झाली की गडबड ही होतेच होते. शेतकरी कर्जमाफीचीदेखील राज्य सरकारने घाईगडबडच केली आहे. त्यामुळेच सरकार रोज कर्जमाफीचे नवनवीन ‘वायदे’ करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र हातात असलेला गरीब शेतकरी मात्र कर्जमाफीच्या या ‘वायदे’ बाजारात ‘भरलेला’ सातबारा आणि ‘कोरे’ बँक पासबुक पाहत हताशपणे उभा आहे. कर्जबाजारीपणाच्या आगीतून कर्जमाफीच्या फुफाटय़ात अशी त्याची अवस्था झाली असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.

कर्जमाफीची घोषणा करतानाही सरकारकडून असच केल गेल. कर्जमाफीचे श्रेय आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांना, ‘सातबारा कोरा करा’ या एकाच मागणीसाठी १५ वर्षे एकाकी लढा देणा-या शिवसेनेसारख्या पक्षाला मिळणार नाही यासाठी घाई करण्यात आली. ‘कर्जमाफी सन्मान सोहळय़ा’चा आपटी बार फोडण्याची आणि कर्जमाफी प्रमाणपत्रांचे कागदी बाण उडविण्याची घाईदेखील श्रेयाची ‘दिवाळी’ साजरी करण्यासाठीच केली गेली. शेतकरी कर्जमाफी हा लाखो शेतक-यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असला तरी राज्यकर्त्यांसाठी तो श्रेयाचा झाला आहे. शिवसेनेसाठी शेतकरी कर्जमाफी ही कधीच श्रेयाची लढाई नव्हती. शेतक-यांची लढाई म्हणूनच शिवसेना कर्जमुक्तीचा लढा लढली आणि सातबारा कोरा होईपर्यंत लढत राहणार असल्याच या अग्रलेखातून सांगण्यात आल आहे,

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत