बळीराजासाठी आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ १० मार्चपासून

मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ येत्या १० मार्चपासून मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील ३२ लाख शेतकऱ्यांना होणार असून त्यासाठी २९ हजार कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा सहकार मंत्री पाटील यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पूर्वीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना त्रास झाला होता. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. आधार जोडणी असलेल्या बँक खात्यांनाच कर्जमाफी दिली जाणार आहे. त्या दृष्टीने शासकीय यंत्रणा काम करत आहे.

Loading...

आतापर्यंत झालेल्या कामकाजात ९७ ते ९८ टक्के बँक खाती आधारशी जोडण्यात आली आहेत. मात्र, एखाद्या वयोवृद्ध शेतकऱ्याच्या बोटांचे ठसे जुळत नसल्यास अशा ठिकाणी पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. याबाबत नेमके काय-काय बदल सुचवले आहेत ते समोर आल्यानंतर त्यावर बोलणे उचित ठरेल, असे सांगून या विषयाबाबत पाटील यांनी सावध पवित्रा घेतला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार