आसमानी संकटानंतर शेतकऱ्यांवर आता सुलतानी संकट !

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील 104.45 कोटी कृषी पंपचे वीज बिल थकीत झाल्यामुळे तब्बल 12 हजार सहाशे एक शेतकऱ्यांची कृषी पंपची वीज पुरवठा महावितरण कंपनीने बंद केला असून सध्या त्वरित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज बिल भरावे लागणार आहे , त्याशिवाय कृषी पंप चालू होणार नसल्याचे सांगितले जात जात असल्याने बिले भरण्यासाठी शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी पासून शेतकऱ्यांची कृषी बिले थकीत झाले आहे होते परंतु वीज पुरवठा सुरळीत होता , यंदा महावितरणचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून वीज बिल भरवून घेतली जात आहे . दुसरीकडे यंदा फुलंब्री तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज बंद झाली असल्याने बिले सक्तिने भरवून घेतली जात आहे. त्यामुळे शेतकरी प्रशासनावर मोठा रोष व्यक्त करत आह.

Loading...

यंदा तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे . फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेती पिकाला केलेला खर्च देखील निघणे अवघड झाले आहे त्यातच आता महावितरणने बिले भरण्याचा तगादा शेतकऱ्यांच्या पाठीमागे लावला आहे . त्यामुळे यंदा एक रुपया नफा नसलेली शेती टिकवण्यासाठी शेतकरी वर्ग मोठी आर्थिक अडचणीत सापडला आहे . गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्के ही उत्पन्न घेणे शक्य नाही त्यातच विहिरीला पाणी केवळ आपली जनावरे आणि मोजक्या पिकाला पाणी देता येईल अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्याची झालेली असतांना मात्र महावितरणला शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याचा सपाटा सुरु केला असल्याची चर्चा शेतकरी करत आहे .

तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती

यंदा सुरवातीला पहिला पाऊस चागला पडला त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला लागणारा मोठा खर्च करून टाकला परिणामी होते ते पैसे शेतीला लावून टाकले त्यानंतर पावसाचे तालुक्यात अचानक दांडी मारली. त्यामुळे आता शेतीत गुंतवलेले पैसा निघणे अवघड झाले आहे त्यात यंदा शेतकऱ्यांची कर्ज माफी गाजली त्यामुळे राष्टाकुट बँकांनी नवीन कर्ज शेतकऱ्यांना दिले नाही, सावकारी , उसनवारी आणि खाजगी बँकेचे कर्ज अनेक शेतकऱ्यांनी काढले आता हे कर्ज कसे फेडचे या चिंतेने शेतकऱ्याला ग्रासलेले असताना आता महावितरण म्हणते किमान पहिला हप्ता प्रति वीज कोटेशन भरा तरच विधुत पूर्वठा देऊ अन्यथा बंदच ठेवू असे झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे .

फुलंब्री तालुक्यातील कृषी पंपाची स्थिती

१) तालुक्यातील एकूण कृषी पंप = 17704

२) वीज बिल थकित झाल्याने बंद केलेले कृषी पंप = 12601

३) एकूण कृषी पंपाची थकबाकी = 104.45 कोटी

४) थकबाकी भरलेली एकूण रक्कम = 60 लाख रुपये

५) वीज बिल थकीत असल्याने बंद केलेले रोहित्र = 801

६) थकबाकी भरलेले एकूण ग्राहक = 1849

काय म्हणतात शेतकरी

यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता आता पासूनच आहे त्यात शेतीला पाणी देणे दूरच सध्या केवळ 15 ते 20 मिनिटे कृषी पंप चालतो त्यातून थोडेफार पिकाला पाणी देता येते तेही पुढील महिनाभर चालणार त्यानंतर शेतातील पंप बंदच करून ठेवावे लागणार आहे .
रामचंद्र तुपे, शेतकरी फुलंब्री

माझ्या शेतात सध्या दोन जनावरांना पुरेल एवढा ऊस आहे परंतु तो हो आता वीज पुरवठा बंद केल्याने सुकून जात आहे यंदा शेतीतून काहीच उत्पन्न झाले नाही शिवाय शेतीला झालेला खर्च देखील फिटणार नाही त्यामुळे आता वीज बिल भरण्यासाठी कोठून पैसा आणावा हे कळत नाही
पुंडलिक किसन काळे, पिरबावडा शेतकरी

ज्या शेतकऱ्यांचे वीस हजार रुपये थकीत आहे त्यांनी प्रति कृषी पंप ३००० रुपये आणि २० हजार रुपयांच्या वरती थकीत असणाऱ्या शेतकऱ्याला किमान ५ हजार रुपये प्रति पंप भरावा लागणार आहे . वारेगाव सर्कल अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्व ट्रान्स्फरमरचा वीज पुरवठा आम्ही बंद केले आहे . या प्रमाणे बिल भरवल्यावर वीज पुरवठा सुरळीत करू
आश्विनी ढके, कनिष्ठ अभियंता महावीतरण वारेगाव. ता. फुलंब्री.

मुख्यमंत्री कृषी संजवजी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी महाविविरणाचे बिल भरून सहकार्य करावे ज्या शेतकर्यांनी किमान एक हप्ता बिल भरले आहे अश्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे त्यामुळे बिल भरून महावितरणाला सहकार्य करावे .
अरुण गायकवाड, उपअभियंता महावितरण फुलंब्री

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले