मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनतर दुसरी मोठी घोषणा म्हणजे आता नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे.
“महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार (ग्रामविकास विभाग) बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्येही सुधारणा करण्यात आली आहे.
-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)-बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
(पणन विभाग)— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2022
दरम्यान राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार आहे. यासोबतच कोरोना प्रतीबांधक लस म्हणून राज्यातील १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे सर्वांना कोरोना प्रतीबंधक लस मिळावी हा हेतू साकार होईल. सध्या राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आकडा कमी असून बुस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या:
- Viral video | पोलीस हवालदाराला चारचाकीने नेले फरफटत; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
- Petrol Price : शिंदे सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त
- Eknath Shinde : “१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत”, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Sanjay Raut : “फक्त दोघांनी शपथ घेतली, म्हणजे सरकार आलं असं नाही”; राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला
- Clyde Crasto : “क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<