औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर

औरंगाबाद : सरकारकडून मिळणारी आश्वासने प्रत्यक्षात उतरत नसल्याचा आरोप करून औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील शेतक-यांनी यावेळी रस्त्यावर दूध फेकत सरकारचा निषेध केला. गेल्या 1 जून रोजी शेतकरी संप मिटवण्यासाठी सरकारने अनेक आश्वासने दिली होती.

मात्र यातील एकही आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही,असा आरोप शेतक-यांनी केला. यावेळी सरकारच्या आश्वासनांची प्रतिकात्मक होळी सुद्धा करण्यात आली. दुधाचे दर वाढवले जातील असे केवळ हवेत आश्वासन देण्यात आले.

प्रत्यक्षात दुधाचे दर वाढण्याऐवजी कमी झाले. येणाऱ्या चार महिन्यात महाराष्ट्रात सरकार विरोधी चळवळ उभारणार असल्याचे किसान क्रांती संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. औरंगाबादमध्ये किसान क्रांतीच्य़ा झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.