महाबीजच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना बियाणे मिळेना, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची नाराजी

लातूर: पेरणी तोंडावर आलेली असताना लातूर जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा गतवर्षीपेक्षा यंदा अपूरा म्हणजे २० हजार क्विंटलच पुरवठा करण्यात आल्यामुळे तो आजमितीला पूर्णत: संपला असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी आणि महाबीज कार्यालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे खाजगी कंपन्याचे महागडे बियाणे घेण्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय उरलेला नाही. महाबीजच्या अशा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक लुट होत असल्याचे दिसत आहे.

शासनाच्या महाडिबीटी पोर्टलद्वारे जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांसाठी मागणी नोंदवली होती. मात्र यातून लॉटरी पद्धतीने केवळ ४ हजार शेतकऱ्यांची निवड केली होती. त्याच शेतकऱ्यांनी ३ हजार ३९५ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहेत. तर उर्वरित १९ हजार शेतकरी प्रतिक्षा यादीत आहेत. तसेच खुली विक्री आणि पीक प्रात्यक्षिक मधील असे एकूण १५ हजार क्विंटलची विक्री झाली आहे.

हजारो शेतकरी महाबीजच्या बियाणांपासून वंचित राहिले असून खाजगी कंपन्यांच्या धोरणाने ते त्रस्त झाले आहेत. शासन आणि महाबीजच्या भोंगळ कारभारामुळे खाजगी कंपन्या शेतकऱ्यांची मोठी लूट करत असल्याचे दिसून येत आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी बियाणेच खरेदी केले नाहीत. त्यामुळे उर्वरित प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप केले जाईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक डी. एस. गावसाने यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP