fbpx

गंगापूर कारखाना ताब्यात घेणा-या अधिका-यांसमोर शेतकऱ्यांची निदर्शने

अभिजित कटके

औरंगाबाद  : गंगापूर साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. तसेच, यावेळी काही शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.त्यामुळे साखर कारखान्याचा हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मात्र, शेतक-यांचे हे रुप पाहून अधिकारी माघारी फिरले. थकित कर्जामुळे कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. तसेच, बँकेने हा कारखाना राजाराम फुड्स कंपनीला विकला आहे. मात्र, आर्थिक बाबींची पूर्तता न केल्याने प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखाना परत घेण्याच्या हालचाली सुरू केल्याने गंगापूर तालुक्यातील शेतकरी आणि कामगार पुन्हा अडचणीत आले आहेत.