पराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी ?

टीम महाराष्ट्र देशा – नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील अपयशामुळे नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेसाठी तयारी सरू केली आहे. पराभवामुळे मोदी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पराभवामुळे तळागाळातील जनतेला आकर्षित करण्यासाठी सरकारच्या वतीने काही विशेष पावले टाकले जातील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारतर्फे तब्बल ४ लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीचा जवळपास २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. तीन राज्यातील पराभवामागे शेतकऱ्यांच्या रोषाचा मोठा हात होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पुन्हा याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...