राज्यसरकारने जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी अपूर्णच – आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

aaditya thakray

टीम महाराष्ट्र देशा : ” राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी नाही . या कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला नाही. असे म्हणत शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपनिशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या पाच दिवसांवर आल्या आहेत. तर निवडणुकांचा प्रचारही अंतिम टप्प्यात आला आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे सोमवारी (ता. १४) झालेल्या सभेत आदित्य यांनी, शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या मुद्द्यावर टीका करत अप्रत्यक्षरीत्या भाजपला टोला लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले, ”भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची कर्जमाफी थेट त्यांच्या खात्यात दिली असून, ५० लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारने दिलेली ही कर्जमाफी पुरेशी नाही.” तसेच या कर्जमाफीचा लाभ अजूनही संपूर्ण शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा दावा आदित्य यांनी केला. ” कर्जमाफीच्या मुद्यावरून सेना-भाजपमध्ये एकमत नसल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळत आहे.

या सभेत आदित्य यांनी शेतकरी कर्ज माफीच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा सुद्धा साधला. ” शिवसेनेने नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतली असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे आदित्य यावेळी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शिवसेनेसाठी बहुमताचा जोग्वाही त्यांनी यावेळी मागितला. दरम्यान निवडणूक प्रचारात विरोधक भाजप-शिवसेनेवर निशाणा साधत आहे. तर सत्ताधारी पक्ष गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचून प्रचार करत आहेत. मात्र अशात आदित्य यांनी रिसोड येथे झालेल्या सभेत भाजपवरचं टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :