fbpx

शेतकरीकन्यांच्या उपोषणावर पोलिसांची दडपशाही, आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न

पुणतांबा

पुणतांबा : शेतमालाला हमीभाव, सरसकट कर्जमाफी तसेच दुधाला ५० रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी पुणतांबा येथील शेतकरीकन्या शुभांगी जाधव, पूनम जाधव, निकिता जाधव या तिघींनी गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, अद्यापही सरकारकडून काही हालचाली दिसत नसताना दुसरीकडे तिन्ही आंदोलकांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे पोलिसांनी बळजबरीने आंदोलक मुलींवर कारवाई केली आहे.

दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. अनिश्चित पर्जन्यमान , वेळोवेळी करावा लागणारा दुष्काळाचा सामना , बँकांची शेतीसाठी घेतलेली कर्जे , नेहमीच तोट्यात नेणारा बाजारभाव यासाऱ्या कारणांमुळे शेतकरी भरडला जात आहे. तसेच सरकारची बेताल व अविश्वसनीय आश्वासन यासाऱ्या प्रकारामुळे शेतकरी कुटुंब हे नेहमीच दारिद्र्य रेषेच्या जवळ भटकत असते. शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विविध मागण्या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी या तीन कन्यांनी मागील सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन केले आहे. आतापर्यंत उपोषण स्थळाला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी भेट दिली.

दरम्यान, सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर आमची शेती करावी. त्याबदल्यात आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार द्यावा, अशी मागणी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी केली आहे

1 Comment

Click here to post a comment