fbpx

शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनं आता थेट कॉर्पोरेट कंपन्यांना विकता येणार

टीम महाराष्ट्र देशा – शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा तसंच शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनं थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकता यावीत यासाठी राज्य शासनानं जागतिक बँकेच्या सहाय्यानं हाती घेतलेल्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य शासन, विविध कॉर्पोरेट कंपन्या, शेतकरी कंपन्या यांच्यामध्ये 46 सामंजस्य करार करण्यात आले.

प्राथमिक टप्प्यात राज्यातील 10 हजार गावांमध्ये स्मार्ट प्रकल्प राबवला जाणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देणं आणि या माध्यमातून कृषी तसंच ग्राम विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं स्मार्ट प्रकल्प क्रांतिकारी ठरेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी स्मार्ट प्रकल्पाच्या लोगोचं तसंच संकेतस्थळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.

दीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार