Share

Government Scheme for Farmers | केंद्राच्या ‘या’ योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतो 5 पट आर्थिक लाभ

टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना (Government Scheme for Farmers) राबवत असते. कारण देशातील कृषीक्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानासह शेतकरी आपल्या शेती पद्धतीमध्ये बदल करत आहे. अशा परिस्थितीत सरकार काही योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. तर काही योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कर्ज किंवा विम्याची सुविधा उपलब्ध करून देते. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सुरू केलेली अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PM Fasal Vima Yojana). योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना खरीप, रब्बी आणि बागायती पिकांसाठी आर्थिक सुरक्षिततेची हमी देते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी 2%, बागायती पिकांसाठी 5% आणि रब्बी पिकांसाठी 1.5% प्रीमियर भरावा लागतो. अलीकडेच एका अहवालानुसार प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत गेल्या सहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमच्या बदल्यात त्यांना नुकसान भरपाई म्हणून केंद्र सरकारकडून 5 पट रक्कम देण्यात आली आहे.

कृषी मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे काही आकडे शेअर केले आहे. त्यानुसार, गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांच्या रक्षणासाठी सरकारला 25 कोटी रक्कम प्रीमियम स्वरूपात दिली होती. त्याबदल्यात शेतकऱ्यांना पाच पट रक्कम म्हणजेच 1.25 लाख कोटी रुपये नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात आल्याचा दावा सरकार करत आहे. नुकताच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तांत्रिक विकास आणि हवामान संकटाच्या धर्तीवर प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये काही सकारात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशामध्ये हिवाळा सुरू होताच शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सूचना देत प्रधानमंत्री फसल बीमा योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्यास सांगितले आहे. रब्बी हंगामात येणाऱ्या हरभरा, मेथी, मोहरी, गहू इत्यादी त्यांच्या पेरणीसाठी शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेस अर्ज केल्यास ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना किमान 745 रुपये द्यावे लागतील. त्या बदल्यात सरकार शेतकऱ्यांना 77 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना (Government Scheme for Farmers) राबवत असते. कारण देशातील कृषीक्षेत्र दिवसेंदिवस वाढत …

पुढे वाचा

Agriculture

Join WhatsApp

Join Now