यवतमाळ : कापूस उत्पादक शेतकर्यांना एक जून पूर्वी कापसाचे बियाणे विक्री करू नये, असे परिपत्रक राज्य सरकारने काढल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये जाऊन बियाणे खरेदी करत आहे. कापूस बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांची तारांबळ उडत आहे.
जिल्ह्यातील ज्या शेतकर्यांकडे मुबलक पाण्याची सोय आहे, असे शेतकरी मान्सून पूर्व कापसाची लागवड करायचे आणि भरघोस उत्पादन घेत होते. मात्र अलीकडे गुलाबी बोंडअळीने चांगलाच कहर केला आहे. बोंडअळीची सायकल तोडायची असेल तर विक्रेत्याने कापसाचे बियाणे शेतकर्यांना 1 जून पूर्वी देऊ नये, असे परिपत्रक काढले. त्यामुळे बियाण्याची किंमत वाढण्याच्या भीती पोटी शेतकरी बाहेरच्या राज्यातून बियाणे खरेदी करत आहे. वेळेवर शेतीचे नियोजन केल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी बियाण्यासाठी धावपळ करत आहे. कापसाची लागवड उशिरा केली तर बोंडअळी येणार नाही. अशी हमी सरकार देणार काय असा प्रश्न शेतकर्यांकडून विचारला जात आहे.
यवतमाळ जिल्ह्याची ओळख पांढर्या सोन्याचा जिल्हा म्हणून आहे. येथील शेतकरी कापसाच्या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी कापूस लागवडीला प्राधान्य देतात. अल्पभूधारक शेतकरी तर कापसाशिवाय दुसर्या पिकाची लागवडच करत नाही. हे पीक त्यांच्यासाठी हमखास उत्पन्न देणार आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्ष पासून कापसाचीच लागवड ते करत आहे. सध्या बाजार पेठेत कापसाचे बियाणे मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांची बियाण्यासाठी परराज्यात भटकंती सुरू आहे.
यंदा मान्सून वेळेवर धडकणार आहे. पेरणीसाठी शेतकरी तयार असले तरी कृषी केंद्रातून बियाणे विक्री करण्यात येत नाही. एक जूनपूर्वी बियाणे मिळणार नाही, असे सांगितले जाते. बोंडअळी कधीही येते. त्यामुळे लवकरात लवकर बियाणे मिळाले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :