शेतकऱ्यांचा एल्गार थेट राजधानीत; मोदी सरकारविरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात एका बाजूला शेतकरी कधी नव्हे तो संपावर गेला तर दुसरीकडे मध्यप्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुषपणे गोळीबार करण्यात आला.

पण आता सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हमिभावाचं गाजर दाखवणाऱ्या मोदी सरकारविरोधात संपूर्ण देशातील शेतकरी 20 नोव्हेंबरला थेट राजधानी दिल्ली मध्ये एकवटणार आहे. यासंदर्भात दिल्लीत विविध राज्यातील शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये राजू शेट्टी, मेधा पाटकर, योगेंद्र यादव उपस्थित होते.

सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.Loading…
Loading...