अधिकाऱ्यांना ठेवले देवळात डांबून; महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा दणका

बदनापूर: चनेगांव येथे शनिवारी संतप्त गावकऱ्यांनी राजुर ते औरंगाबाद मार्गावर रस्ता रोको करून महावितरणचे वरिष्ठ कर्मचारी पुंड दभाडी बिटचे परदेशी व सहकारी यांना चक्क गावातील मारुती मंदिरात डांबून ठेवले व जो पर्यत आमच्या गावाची विज जोडनी करत नाही तो पर्यत रस्ता रोको चालुच ठेवनार असा पवित्रा घेतला, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून लवकरात लवकर विज वीज पुरवठा नियमित करण्याचे आश्वसन दिले त्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको मागे मागे घेतले हे अंदोलन करणारे शेतकरी संघटनेचे निवृत्ती शेवाळे, बळीराम पुंगळे, डॉ ढोरकुले, शिवसेनेचे रविंद्र घुगे,विष्णू सानप, मा.सरपंच तायडे ,पो.पा,मुटकुळे,,संदीप कायदे,यासह महिला व युवक वर्ग घटनास्थळी पोलीस यंञाना फौज फाटयासह उपस्थित होती

नगदी चे पिक कपाशी बोंडअळीमूळे हातचे गेले आहेच, तोंडाशी आलेल पिक,ज्वारी,हरभरा,गहू विज खंडित केल्यामुळे वाया जाण्याची वेळ आली सरकारचे धोरण शेतकऱ्यांच मरन पाहत आहे,
रविंद्र घुगे (शिवसैनिक)

कापसाला हमी भाव नाही, सोयबिन बेभाव विकली यावर्षी मुलींमच्या विवाहाची चिंता वाढली.
पिक विमा नाही सर्व स्वप्न भंगले
प्रेमनाथ सानप,खरेदी-विक्री संघ, व्हाईस चेरमन (बदनापुर)

You might also like
Comments
Loading...