fbpx

धक्कादायक, चिता पेटवून शेतकऱ्याने केली आत्महत्या

यवतमाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच सुसाईड नोटमध्ये नाव लिहील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे वृद्ध शेतकऱ्याने शेतातील पऱ्हाटीची चिता पेटवून आत्महत्या केली आहे. माधव शंकर रावते (वय ७१) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

माधव रावते हे राहत असलेले गाव अतिशय दुर्गम भागात आहे. त्यामुळे शनिवारी झालेली घटना सोमवारी समोर आली आहे. रावते यांची चार एकर कोरडवाहू शेती आहे. सततची नापीक आणि बोंडआळीच्या प्रादुर्भावाने रावते यांच्या शेतीचे गणित पूर्ण बिघडले होते. तर स्टेट बँकेच्या ६० हजारांच्या कर्जामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते.

माधव रावते हे शनिवारी शेतात गेले यावेळी शेतातील गोळा केलेल्या पऱ्हाटीची चिता पेटवून त्यांनी स्वतःला त्यात झोकून देत आत्महत्या केली.