नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याच लिहित शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ: मी कर्जबाजारी झालोय यामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहित यवतमाळमधील शंकर चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ३ लाख रुपयांचे कर्ज आणि नापिकीमुळे आलेल्या नैराशातून चायरे यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याच समजतय.

शंकर चायरे हे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील राजूरवाडीचे रहिवासी होते.त्यांची सहा एकर शेती होती. यंदा चायरे यांनी कापूस आणि तूर याची लागवड केली होती. मात्र बोंड अळीने त्यांचे सगळे पिक उद्धवस्त झाले होते. दरम्यान, आत्महत्येच्या आधी त्यांनी सहा पाणी सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये मोदी सरकारच्या धोरणांमुळे अडचणीत आल्याच त्यांनी लिहील आहे.

You might also like
Comments
Loading...