आगीत जळालेल्या बैलाला कत्तलखाण्यात न पाठवता त्याने केला मुलाप्रमाणे सांभाळ

सचिन मुर्तडकर(अकोला ) : अकोला जिल्ह्यातील पातुर नानासाहेब येथील रहीवासी असलेले शेतकरी निरंजन इंगळे उर्फ माऊलीकर यांनी शेतकरी वर्गांसाठी आदर्श ठरणारा संकल्प केला आहे. हा संकल्प प्राणी माञांवर दया करा असा संदेश देणारा आहे. या जनावरांनी शेत जमिनीत राबत परिवाराची सेवा केली असतांना एखद्या अपघाताने अथवा आजारी पडल्याने त्यांना कसायाच्या हाती देणे हे उपकाराची परतफेड अपकाराने करण्यासारखे आहे . आपल्या परिवारात कोणी अपंग, आजारी किंवा वयोवृध्दांना झाल्याने आपण त्यांना स्वत:पासून दूर लोटत नाही मग तसेच बैल,गाय व गोऱ्हे यांचा सांभाळ केला पाहीजे असा आदर्शवत संदेश इंगळे यांनी शेतकरी आणि पशुपालकांसमोर ठेवला आहे.

निरंजन इंगळे यांचेकडे १५ वर्षापासुन एक बैल जोडी, गाय व गोऱ्हे असून त्यांची ते जिवापाड काळजी घेत असतात.चार वर्षापुर्वी त्यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली त्या गोठ्यामध्ये बैल जोडी बांधलेली होती. त्या जोडीमधील एक बैल आगीची झळ लागताच दोर तोडुन पळाला मात्र दुर्दैवाने दुसऱ्या बैलाला दोर तोडता न आल्याने आगीत तो भाजल्या गेला. निरंजन इंगळे यांनी भाजलेला बैल पशुवैद्यकीय उपचारा करीता पशुचिकित्सालयात आणले असता डॉक्टरांनी बैल जास्त प्रमाणात भाजल्याने वाचु शकणार नसल्याच त्यांना सांगितले. त्यावेळी त्यांच्यासमोरही या बैलाचा सांभाळ न करता कत्तलखाण्यात पाठवण्याचा पर्याय होता मात्र तसे न करता त्यांनी न बैलाची काळजी घेत स्वत: च पशु वैद्यकीय उपचार केले.

आगीत जखमी झालेल्या बैल घरच्या खुंट्यावर मेला तरी चालेल पण कसायला विकणार नाही हे या निर्णयाने आज जखमी बैल पूर्णपणे चांगला झाला व डौलदारपणे शेत जमिनीत राबतोय निरंजन यांच्या सेवेमुळेच जखमी बैलाचे प्राण वाचले. हीच गोष्ट आज शेतकऱ्यांपुढे एक आर्दश निर्माण करत आहे. शेतकरी व पशू पालकांनी जनावरांवर कितीही संकट आली तरीही त्याची सेवा केली पाहीजे परंतू कत्तलखाण्याचा मार्ग दाखवू नये. हीच या मुक्या प्राण्याप्रती कृतघ्नता ठरेल.