Farmer Strike- अखेर बळीराजाला मिळाला न्याय..अल्पभूधारक शेतकऱ्यांच कर्जमाफ

कर्जमाफी तसेच शेतमालाला हमीभाव आणि इतर मागण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालय. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलाय. मंत्रीगट आणि शेतकरी आंदोलकांच्या सुकाणू समितीमध्ये झालेल्या वादळी बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलै पर्यंतची मुदत असणार आहे. या निर्णया सोबतच आंदोलना दरम्यान शेतकऱ्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील मागे घेतले जाणार आहेत. यामुळे आता एकंदरीतच शेतकरी लढ्याला मोठं यश मिळाल असल्याच मानल जातंय.