आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या दिंडीचे पुण्यात आगमन

आमच्या बापाने जी चूक केली ती तुम्ही करू नका : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं आवाहन

लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे विविध दिंड्यांमधुन मार्गक्रमण करत आहेत मात्र आज पुण्यात दाखल झालेल्या दिंड्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या दिंडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आधारतीर्थ आश्रमाकडून या दिंडीचे आयोजन करण्यात आले असून ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीसोबत ही दिंडी पुण्यात दाखल झाली आहे  . दिंडीचे हे तिसरे वर्ष आहे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जवळपास पन्नास मुले या दिंडीत सहभागी झाली आहेत आमच्या बापाने जी चूक केली ती तुम्ही करू नका , शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, पर्यावरणाचे रक्षण करा ,शेतकरी वाचवाअसे आवाहन करीत ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झालीय