लॉकडाऊन लागलं तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत, आंदोलकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

modi farmer

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लादलेल्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या अनेक महिन्यापासून जगाचा पोशिंदा शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेला आहे. उन, वार, पाऊस कशाचीही तमा न बाळगता जोपर्यंत केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, आतापर्यंत सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाल्या. परंतु त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्यावर ठाम आहेत. तर, ‘सरकारनं शेतकरी आंदोलनाला शाहीन बाग सारखी वागणूक देऊ नये. जसं की गेल्या वर्षी दिल्लीच्या शाहीन बागमध्ये विरोधादरम्यान करण्यात आलं होतं, असं भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले आहेत.

दुसरीकडे, ‘जो पर्यंत हे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत आणि एमएसपीवर कायदा तयार केला जात नाही तोवर आंदोलक शेतकरी आपलं आंदोलन स्थगित करणार नाहीत. सर्व शेतकरी सीमेवर बसून राहतील. सरकारनं कोणत्याही चुकीच्या समजूतीत राहू नये आणि त्यांचं आदोलन दीर्घ कलावधीसाठी चालणार आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

तर, ‘जरी लॉकडाऊन लागलं तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत. कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. देशात आपात्कालिन कर्फ्यू लावण्यात आला किंवा कोणतीही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तरी शेतकरी मागे हटणार नाहीत,’ असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या