कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

टीम महाराष्ट्र देशा : कांद्याचे कोसळणारे दर नियंत्रणात आणून हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, वीज बील माफ करावे, आदी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, समता परीषद, आदी पक्षांसह कांदा उत्पादक शेतकर्यांनी नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे पाच कंदील चौकात विंचूर प्रकाशा महामार्गावर सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.

१५ डिसेंबरपर्यंत कांद्याला हमीभाव मिळाला नाही तर जिल्ह्यात आमदार व खासदारांना गावबंदी केली जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी देवळा येथे कांदाप्रश्नावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात दिला.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर

राजू शेट्टींच्या मदतीला हार्दिक पटेल ; मुंबईचा दुध पुरवठा रोखणार

पुण्यात रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात असणारे मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात