राहुल गांधींनी करून दाखवलं, मध्यप्रदेश पाठोपाठ छत्तीसगढमध्येही शेतकरी कर्जमाफी

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश छत्तीसगढ आणि राजस्थान निवडणुकीपूर्वी पक्षाची सत्ता आल्यास शेतकरी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. अपेक्षेप्रमाणे तिन्ही राज्यात काँग्रेसला सत्ता हस्तगत करण्यात यश आले आहे, त्यानंतर आता राहुल यांनी दिलेले आश्वासन पाळत मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांनी शेतकरी कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात या निर्णयांची चर्चा सुरू आहे.

मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ तसेच छत्तीसगढचे भुपेश बागेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पहिला निर्णय हा शेतकरी कर्जमाफीचा घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही मुख्यमंत्र्यांचे देशभरातून कौतुक केले जात आहे, काँग्रेसने विजय मिळवलेल्या राज्यांमध्ये लोकप्रिय निर्णय घेत राहुल गांधी संपूर्ण देशभरात छाप पाडत असल्याचं बोललं जात आहे.