fbpx

सरकारमधील निर्ल्लज लोक आमच्यावर टीका करतायत; टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा

पुणे: १ जूनपासून देशभरातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे. मात्र, हे आंदोलन कॉंग्रेस पुरस्कृत असल्याचा आरोप केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केला आहे. यावर आता राष्ट्रीय किसान महासभेचे संदीप गिड्डे यांनी उत्तर देत, देशभरातील शेतकऱ्यांकडून जनआंदोलन उभारले जात असताना सरकारमधील निर्ल्लज लोक आमच्यावर टीका करत असल्याचा पळटवार केला आहे. तसेच आंदोलकांवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणीही गिड्डे यांनी केली आहे.

शेतकरी स्वतः आंदोलनात सहभागी होत आहेत, आंदोलनाला कोणताही नेता नसून हे जनआंदोलन आहे. मागीलवेळी ३ जूननंतर अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले आणि चमकोगिरी करून गेले. देशभरात प्रतिसाद मिळू लागल्यानंतर महाराष्ट्रतील लोक हे आंदोलन भाजपचे म्हणतात , तर सरकारमधील मंत्री कॉंग्रेस पुरस्कृत असल्याचा आरोप करत असल्याच यावेळी गिड्डे यांनी सांगितले आहे, अशा पद्धतीने चुकीची वक्तव्ये करण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सरकारमधील मंत्र्यांना याच काहीही गांभीर्य नसल्याच दिसत आहे. बळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याच काम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केल आहे. शेतकऱ्यांचाआदोलन ‘नाटकी’ असल्याचं सांगत शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचं वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केल आहे.

दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून दहा दिवस संपाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाविषयी पाटणा येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारले. त्यावर माध्यमांमध्ये झळकण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं, असल्याच उत्तर त्यांनी दिलं. देशभरात बारा ते चौदा कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी संघटनेत ५०० ते १००० शेतकरी असतील आणि त्यांना माध्यमांमध्ये झळकण्यासाठी काही तरी करावं लागतं, असंही ते म्हणाले.