स्वाभिमानी शेतकरी संघटना युपीएमध्ये सामीलच्या केवळ वावड्याच – तुपकर

raju shetty and ravikant tupkar

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस प्रणित युपीए आघाडीमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे, मात्र आम्ही अद्याप कोणत्याही आघाडीमध्ये सामील झालेलो नाही, कोणाशीही आघाडी करायची असल्यास पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाते आणि नंतरच निर्णय होतो. सध्यास्थितीला सर्व राजकीय पक्षाशी आम्ही समान अंतरावर असून अशा बातम्या म्हणजे केवळ वावड्याच असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना स्पष्ट केलं आहे.

raju shetty and rahul gandhi

स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली, यावेळी काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उपस्थित होते. दरम्यान ही बैठक म्हणजे स्वाभिमानी युपीएमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमाकडून प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

raju shrtty with upa

शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव मिळावा, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा या संदर्भात दोन अशासकीय विधेयक खासदार राजू शेट्टी सभागृहात मांडणार असून कॉंग्रेसने सभागृहात पाठींबा द्यावा यासाठी ही बैठक झाल्याचं तुपकर यांनी सांगितले आहे.