शेतकरी नेते राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघात ‘हा’ उमेदवार देवू शकतो आव्हान

पुणे: हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर ज्ञानेश्वर मुळे उभे राहण्याची दाट शक्यता आहे. डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे प्रशासकीय अधिकारी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव आहेत. तसेच ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत. त्यामुळे आपल्याच मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे जर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले. तर हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि ज्ञानेश्वर मुळे यांच्यात चांगलीच राजकीय फाईट पाहायला मिळणार आहे. याबाबत ज्ञानेश्वर मुळे यांनी अजून कोणताही अधिकृत होकार किंवा नकार दिला नाही.

राजकारणात प्रवेशाबद्दल डॉ. मुळे म्हणाले, “मला वाटतं चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. मी भाजपच्या जवळचा आहे, हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. मी सर्वपक्षांच्या नेत्यांना भेटत असतो. मी २०१९ ची निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चेबद्दल बोलायचं झालंच, तर सध्य स्थितीला ना माझा होकार आहे ना नकार”

You might also like
Comments
Loading...