fbpx

दूध दरवाढीसाठी शेतकरी बचाव जनआंदोलनाच्या वतीने निदर्शने

शेवगाव – गेल्या अनेक महिन्यांपासून दुधाला नीचांकी भाव मिळत असून, शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान आज याचा निषेध करण्यासाठी तसेच दुधाच्या दरवाढीची मागणी करण्यासाठी शेवगाव नेवासा मार्गावरील भातकूडगाव फाटा येथे शेतकरी बचाव जनआंदोलनाच्या वतीने आंदोलन करत मोफत दूध वाटप करण्यात आले.

पशुखाद्य उत्पादन खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. अनेक गाईंचे गोठे वस पडले आहेत दूध व्यावसायिक शेतकरी कर्जबाजारी बनत आहे म्हणून शासनाने दुधाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आता शेतकऱ्यांच्या अंत पाहू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी शेतकरी बचाव जनआंदोलनाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी दिला.

शेवगाव नेवासा राजमार्गावरील भातकूडगाव फाटा येथे शेतकरी बचाव जनआंदोलनाच्या वतीने शासनाचा निषेध करून मोफत दूध वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते दूध प्रश्न यापूर्वीही राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी शासनाचा तीव्र निषेध केला आहे वेळ प्रसंगी रस्त्यावर दुध ओतून शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे परंतु शासनाने याकडे दुर्लक्षच केले आहे या व्यवसायाला बळ देऊन दुधाला योग्य भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शेतकरी बचाव जन आंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे राजेंद्र आढाव भाऊसाहेब सामृत शहाराम आगळे यांची भाषणे झाली अशोक मेरड ज्ञानदेव खरड अशोक दुकळे शंकरराव नारळकर जालिंदर आहेर मारुतराव जाधव संतोष मेरड भगवान आढाव आर आर माने संजय आहेर आण्णासाहेब दुकळे योगेश सावंत सचिन फटांगरे अनिल भेंडेकर अमोल वडने देवदान वाघमारे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.