हिवारी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच.

सचिन मूर्तडकर(यवतमाळ) – यवतमाळ पासुन दुर 25 किमी दूर असलेल्या हिवरी येथे विषारी द्रव्य पिऊन कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ज्ञानेश्वर दत्तुजी नेवारे वय 48) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

ज्ञानेश्वर हे   अल्प भू-धारक शेतकरी असून ६ आक्टोबर ला कर्जमाफ झाले कि नाही, हे पाहण्यासाठी भाम्ब ( राजा ) येथे बॅंकेत गेले होते.  जुने कर्ज माफ झाले नाही व नवीन कर्ज मिळणार नाही, असे  बँक व्यवथपकाने सांगण्यात आले. शेतातील सोयाबीन पावसाने खंड दिल्याने हातचे गेले. कपाशींवर बोन्डअळी आली. त्यामुळे पिके मातीमोल झाली आहेत. शेतातील ज्वारी वन्यप्राण्यांनी  फस्त केली. तर खासगी कर्जाचे डोंगर वाढत असल्याच्या चिंतेतून ज्ञानेश्वर यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या मागे वृद्ध आई, पत्नी, दोन मुले आहेत. शासनाने नेवारे कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विविध स्तरारातून करण्यात येत आहे.

You might also like
Comments
Loading...