बोंड अळी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

अमरावती : बोंड अळी व कर्जाला कंटाळून अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. अशोक श्यामराव कडू असे या शेतकऱ्याचे नाव आहे.यासंदर्भआत प्राप्त माहितीनुसार कडू हे दोनपासून घरून बेपत्ता होते. त्यामुळे त्यांचा शोध घेतला असता काटसुर येथील आपल्या शेतात मृतावस्थेत आढळून आले.

त्यांनी विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे त्यांचे शेतात कपाशीची लागवड केली होती मात्र बोण्ड अळीने कपाशीचे पार नुकसान झाले हातचे पीक हातातून गेले व सेन्ट्रल बँकेच्या तिवसा शाखेतून घेतलेले कर्ज या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल घेतले घेतल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. कडू यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.