नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून चक्का जाम आंदोलन

file photo

नाशिक : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होऊन देखील सअनेक जाचक अटी व शर्ती लावल्यामुळे लाखों शेतकरी कर्जमाफी पासून वंचित रहात आहेत तसेच समृद्धि महामार्गासाठी बागायती जमिनी घेवू नये यासाठी आज नाशिक जिल्हाभर शेतकरी संघटनांची सुकाणू समिती यांच्याकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तसेच पालकमंत्र्यांना झेडावंदन करू देणार नाही अशा इशाराही देण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामिनाथन आयोग शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना वृद्धापकाळी पेन्शन3000 रु द्या, पीकविमा सर्व शेतकऱ्यांन चा शासनाने भरावा, समृद्धी महामार्ग साठी पिकाऊ, बागायती जमीन घेऊ नये, भूसंपादन कायदा अमलबजावणी करा या प्रमुख मागण्या घेत नाशिक जिल्ह्यातील मनमाड, चांदवड, दिंडोरी, घोटी, नांदगाव, सुरगाणा, पेठ, त्रंबकेश्वर रोड, पळसे, येवला, नैताळे, चांदोरी यासह जिल्हाभरात मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.