आधार जोडणी नाही तर,कर्जमाफी देखील नाही ?

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, पण कर्जमाफी करता अनेक नियम व अटी देखील लावल्या. त्या अटीची पूर्तता करता करता नाकीनऊ आले. कडक व कीचकट नियम असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीला मुकावे लागणार आहे.आधीच अनेक नियम होते त्यामध्ये आधार जोडणीचा नियमदेखील होता आता सरकारने असे जाहीर केले आहे.जर कर्जमाफी हवी असेल तर कर्जमाफी अर्जा  सोबत आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे.नसेल तर कर्ज माफीला मुकावे लागेल.

सरकार आधार जोडणी बाबत अधिक आग्रही दिसत आहे. याआधी मोबाईल ,पॅन,कार्ड यासोबत आधार जोडणी सक्तीची केली आहे.सरकारकडे कर्जमाफीसाठी एकूण ५६.५९ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. मात्र यातील २.४ लाख शेतकऱ्यांनी आधार कार्डची माहिती अर्जात नमूद केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

कर्जमाफीसाठी अर्ज करताना आधार कार्डची माहिती न देणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज भरताना आधार कार्डची माहिती आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले होते.

राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबरपर्यंत ५६.५९ लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे. मात्र यातील २.४ लाख शेतकऱ्यांनी आधार कार्डची माहिती दिलेली नाही.

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील २५,३३५ जणांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला असून त्यामधील ३३८ जणांनी आधार कार्डची माहिती दिलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डची माहिती दिलेली नाही, त्यांना यासाठी आणखी थोडा वेळ देण्यात येईल, अशी माहिती ‘माहिती आणि तंत्रज्ञान’ विभागाचे मुख्य सचिव व्ही. के. गौतम यांनी दिली.

आम्हाला शेतकऱ्यांकडून अर्ज मिळाले असून आता त्यांची पडताळणी केली जाईल. यानंतर कर्जमाफीचे निकष पूर्ण न करणारे अर्ज बाद केले जातील. मात्र आधार कार्डची माहिती न दिलेल्या शेतकऱ्यांना त्यासाठी आणखी मुदत दिली जाईल,’ असे गौतम यांनी सांगितले.

 

You might also like
Comments
Loading...