‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका लवकरच घेणार निरोप ; गॅरीच्या बायकोची भावुक पोस्ट

गुरुनायच

मुंबई : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर निरोपाची वेळ आलीच. आज 7 मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे.

या पार्श्वभूमीवर ‘ माझ्या नवऱ्याची बायको’ तील गुरुनाथ उर्फ गॅरी अर्थात अभिजीत खांडकेकर याची रिअल लाईफमधील बायको सुखदा खांडकेकर हिने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिजीतसोबतचा (गॅरी) फोटो शेअर करत सुखदाने लिहिले, ‘ तर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होतोय.

अभि… साडे चार वर्षे आणि 1375 वर एपिसोड… याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो, आता तर हा अभिमान आणखी वाढला आहे. कामाप्रतीची तुझी निष्ठा, तुझा त्याग, प्रक्रियेवरचा तुझा विश्वास आणि सातत्य हे सगळे अफाट आणि अकल्पनीय आहे. आम्हाला हा प्रेमळ गुरूनाथ/ गॅरी दिल्याबद्दल आभार. ही भूमिका त्याच्याइतकी इतकी सहज, सुंदर कोणीच वठवू शकले नसते. त्याला प्रेक्षक नक्कीच मिस करतील…’

महत्वाच्या बातम्या