यामी गौतमचा भयावह फोटो पाहून चाहते झाले थक्क

yami

मुंबई : अनोख्या अंदाजाने बॉलीवूडवर राज्य करणारी अभिनेत्री यामी गौतमने सडेतोड उत्तर दिल्याने चर्चेत आली आहे. तिच्या आगामी ‘भूत पोलिस’ या चित्रपटासाठी अधिक चर्चेत येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो तिने अनेकदा शेअर केले आहे. मात्र सध्या तिने शेअर केलेल्या भयावह फोटोची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

यामी गौतमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने भूताचा मेकअप केला असल्याचे दिसत आहे.  ‘मला हॉरर कथानक असलेल्या चित्रपटात काम करायला प्रचंड आवडते, यासाठी मी भूत पोलिस या चित्रपटात ही भूमिका साकारत आहे. ही भूमिका करणे वाटत तितक सोपं नव्हते. कारण मला तयार होण्यासाठी जवळ जवळ तीन तास लागत होते, तसंच ४५ मिनिटं या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी लागत होते’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

दरम्यान, ‘भूत पोलिस’ चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदशिर्त करण्यात आला असून त्यास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद ही मिळतो आहे. चित्रपटाचे शूटींग हिमाचल प्रदेशात करण्यात आला होता. १०  सप्टेंबर २०२१ रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात यामी सोबत सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडीस, अर्जुन कपुर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहे.

महत्त्वाच्या बातम्या