‘सगळा खटाटोप ऋतुराजसाठी..’म्हणत चाहत्यांनी केली सायलीची स्तुती

sayali

मुंबई : छोट्या पडद्यावरून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्रीपैकी एक म्हणजे सायली संजीव. . ‘काहे दिया परदेश’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने आता चित्रपटसृष्टीत लोकप्रियता प्राप्त केले आहे. तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक होत असते. नुकताच तिचा साडीमधील एका फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

या फोटोत सायलीने लाल रंगाची पारंपरिक पैठणी नेसली असून हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस व बॅकलेस ब्लाऊज घातला आहे. नाकात नथ घातली आहे. केस मोकळे सोडले असल्याने सर्वांचे लक्ष वेधत आहे. या फोटोवर सेलिब्रिटी ते चाहत्यांकडून ओहह.., ‘हा सगळा खटाटोप ऋतुराजसाठी चालू आहे..’,’लवकर लग्न कर आता ऋतुराजसोबत’अशा कमेंटस् येत आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव हे दोघे ही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट लाईक करून कमेंट देखील करत होते. त्यामुळे ते दोघे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा रंगत होत्या.

सायलीने ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने गौरीची भूमिका साकारली होती. त्यानंतर चित्रपटसृष्टीत ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय केले आहे. तसेच टीव्हीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश टिळकसोबत ही काम केले होते.

महत्त्वाच्या बातम्या