मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. उर्फी कधी प्लास्टीकच्या पिशव्यांनी बनवलेली ड्रेस तर कधी सेफ्टी पिनने बनवलेले ड्रेस घालत असते. यावेळी उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी एक नवीन लूक शेअर केला आहे. उर्फीच्या या लुकच्या सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहेत.
उर्फीने यावेळी वायर पासून बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, ” ही एक वायर आहे आणि ती कुठूनही कापलेली नाही. मला वाटते की ते बॉम्बसारखे दिसते. मला वाटते की मी पण वेगवेगळे रंग वापरून पाहिलं माझ्यासाठी फॅशन म्हणजे प्रयोग करणे आहे”. उर्फीच्या या व्हिडिओला चाहते भरभरून प्रेम देत आहेत.
उर्फिने आपल्या बोल्ड्नेसमुळे सोशल मिडीयावर वेगळीच खळबळ माजवली आहे. तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल उर्फी फाटलेले कपडे घालून लाखोंची कमाई करते आणि आरामदायी जीवन जगते. चाहते तिच्या लेटेस्ट लुकची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने लेटेस्ट लुक चाह्त्यांसोबत शेअर करताच काही मिनिटातच सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो. उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षाची आहे.
महत्वाच्या बातम्या :