‘फॅंड्री’ फेम अभिनेत्री राजेश्वरीच्या बोल्ड लूकवर चाहते घायाळ

rajewari

मुंबई :   

मराठी चित्रपट ‘फॅंड्री’ च्या माध्यमाने सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात आठवतेय ना. या चित्रपटातील तिचे ‘शालू’ हे पात्र खूप गाजले होते. या चित्रपटात अत्यंत साध्या पेहरावात ती दिसली होती. मात्र, तिच्या बोल्ड लूकमधील काही फोटो व्हायरल झाले असून तिच्या लूकवर घायाळ झाले आहेत.

ती सध्या चित्रपटात जास्त दिसत नाही, मात्र सोशल मीडियावर मोठया प्रमाणात सक्रिय असते. ती सातत्याने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील घटनांची माहिती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते.

तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून तिने फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच यावर जिन्स घातली आहे. या पोजमध्ये खूपच बोल्ड दिसत असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. तिच्या चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया ही दिल्या आहेत. कमेंटद्वारे तिच्या लूकचे कौतूक ही केले आहे.
तसे पाहता राजेश्वरी जास्त चित्रपटात काम केले नाही, परंतू ‘फॅंड्री’ नंतर आयटमगिरी या चित्रपटात काम केले आहे. तसेच नुकतेच तिच्या रेडलाईट या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या