मानसीचा मराठमोळा अंदाज पाहून चाहते घायाळ, म्हणाले…जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री!

manasi

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत मानसी नाईक हे नाव सर्वपरिचित आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. नाकात नथ, हातात हिरवा चुडा असलेल्या फोटोवर चाहते घायाळ होऊन ‘जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री!’. असे कमेंटस केली आहे.

मानसीने अभिनयासोबत तिने डान्सची कला देखील जोपासली आहे. तिच्या डान्सची झलक आपण सर्वांनी पाहिलीच आहे. तिने मराठीमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. मानसी आजकाल सोशल मीडियावर दखील मोठया प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केल्याने चर्चेत आली आहे.

या फोटोत मानसीने आकाशी रंगाची साडी नेसली आहे. हातात हिरव्या रंगाचा चुडा घातला आहे. नाकात नथ घातली आहे. तसेच गळयात एक सुंदर मंगळसूत्र घातले आहे. या फोटोवर ‘प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नाही तर तो रक्तातच असावा लागतो..’ अशी लक्षवेधी कॅप्शन दिली आहे. यावर हजारों चाहत्यांनी लाईक आणि कमेंटस करतांना दिसत आहेत. मानसी नाईक २००७ मध्ये झालेल्या ‘जबदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केला होता. तसेच छोटया पडद्यावरील ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. यामुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाडयावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली आहे. विशेष म्हणजे मानसी नाईक ही अभिनयापेक्षा नृत्य कौश्ल्यामुळे ओळखली जाते.

महत्वाच्या बातम्या :