Share

T20 World Cup 22। रोहित शर्माचा तो फोटो पाहून चाहते संतापले; म्हणाले विराट रोहित पेक्षा चांगला कॅप्टन

T20 World Cup | नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, त्यात सहभागी झालेल्या सर्व कर्णधारांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिली. या फोटोमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ही होता पण हे फोटो पाहून चाहत्यांना प्रचंड राग आला. त्यांनी विराट कोहली याच्या कर्णधारपदाशी रोहितची तुलना केली. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, विराट कोहलीच्या काळात टीम इंडियाचा मान जास्त होता पण आता तसं दिसत नाहीये.

खरं तर, T20 विश्वचषकापूर्वी कर्णधारांच्या फोटोमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोपऱ्यात बसलेला दिसत आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) एका बाजूला का आहे आणि मध्यभागी का नाही ही गोष्ट चाहत्यांना आवडली नाही. यामुळेच लोकांना विराट कोहलीची आठवण येत आहे. खरे तर 2019 च्या विश्वचषकापूर्वी जेव्हा सर्व कर्णधारांचे चित्र समोर आले होते.

https://twitter.com/Here4kohli/status/1581143875657179136?s=20&t=Sbe75tedf80wCGR66iLEkg

त्यावेळी तेव्हा विराट कोहली मध्यभागी बसलेला दिसला होता. मात्र, हे रोहित शर्मासोबत दिसले नाही आणि चाहत्यांनी त्यावर आक्षेप घेतला. चाहत्यांनी रोहित शर्माला ट्विटरवर ट्रोल केले, विराट कोहलीचे कौतुक केले. याबाबत ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतायत. चाहते याबाबत आपली अनेक वेगवेगळी मते देत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

T20 World Cup | नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, त्यात सहभागी झालेल्या सर्व कर्णधारांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिली. …

पुढे वाचा

Cricket Maharashtra Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now