सोनालीच्या मराठमोळ्या अदांवर चाहते फिदा

सोनाली

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. नटरंग चित्रपटातून आणि त्या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्याने सोनाली प्रचंड हिट झाली होती. ‘अप्सरा आली’ या गाण्यातून सोनालीने चाहत्यांना मोहिनी घातली. त्याचं बरोबर उत्तम अशा डान्स आणि सौंदर्यानं सोनालीने चाहत्यांना खिळवून ठेवलं.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला बराच प्रतिसाद देतात. सोनाली सोशल मीडियावर फोटो शेअर करताच तिचे चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि कंमेंट्सचा पाऊस पडतात.

दरम्यान, सोनालीने तिच्या इंस्टग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली मराठमोळ्या लुकमध्ये दिसत आहे. सुदंर साडी चेहऱ्यावर गोड हास्य असा हा सोनीलाचा व्हिडीओ पाहून चाहते अक्षरशः सोनालीच्या प्रेमात पडले आहेत. सोनालीची हि घायाळ करणारी अदा आणि चेहऱ्यावरील हास्य पाहून चाहते तिच्या प्रेमात वेडे झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या