अक्षया देवधरच्या नव्या लुकवर चाहते फिदा; पाहा फोटो

akshya dewdhr

मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतील पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहचली. सध्या या मालिकेने प्रेक्षकांची रजा घेतली असली तरी आजही यातील कलाकरांचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे. नुकतेच अक्षयाने काही फोटो शेअर केले आहे.

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने सुंदर लुक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांची देखील चांगलीच पसंती मिळत असते. सध्या तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

अक्षयाच्या घायाळ करणाऱ्या अदांनी सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतेच गौरी- गणपती निमित्त तिने केलेल्या फोटोशुटची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.

महत्त्वाच्या बातम्या