अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता

अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता

ranbir

मुंबई : गँगस्टरवर आधारित कौटुंबिक कथा असेलला आगामी चित्रपटाच्या माध्यमाने  अभिनेता रणबीर कपूर ‘ॲनिमल’ या चित्रपटात लवकरच झळकणार आहे. ज्यात प्रेक्षकांना भावनांसोबत जबरदस्त ऍक्शनसह बऱ्याच कालावधीनंतर रणबीरच्या चित्रपटाचा आस्वाद चाहत्यांना घेता येणार आहे.

चित्रपट निर्माते संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपटात रणबीर कपूरसोबतच अनिल कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा ‘ॲनिमल’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. माध्यमांतील वृतानुसार, सध्या या सर्व स्टार्सच्या तारखा आणि शूटिंग शेड्यूलवर काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट गँगस्टरवर आधारित कौटुंबिक कथा असेल, ज्यात प्रेक्षकांना भावनांसोबत जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळेल. रणबीर कपूर ‘ॲनिमल’ चित्रपटात’ मनोरुग्णाच्या भूमिकेत दिसणार असल्याचेही सांगितले जात आहे.

रणबीर कपूर सध्या निर्माता लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीरसोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. चित्रपट निर्माते लव रंजन यांचा चित्रपट पुढील वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित होईल, तर ‘ॲनिमल’ चित्रपटाबद्दल अशी माहिती समोर आली आहे की, हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली. आगामी काळात त्याच्या चाहत्यांसाठी चांगल्या चित्रपटांची वर्णी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या