‘दु:खातून सावरण्यासाठी चाहत्यांची आणि परिवाराची खूप साथ मिळाली’

मंदिरा बेदी

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ३० जूनला हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. यामुळे मंदिरा आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज कौशल यांच्या निधनाची बातमीमुळे बॉलिवूडमध्ये देखील शोक व्यक्त केला. पतीच्या निधनानंतर ती सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत असल्याचे पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा तिने एक पोस्ट शेअर करत तिच्या दुःखात तिला साथ देणाऱ्या जनतेचे आभार व्यक्त केले आहेत. यासोबतच तिने एक परिवारासोबत फोटो देखील शेअर केला आहे.

मंदिरा बेदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक शेअर केला सून या फोटोमध्ये ती आपल्या कुटुंबासोबत आनंदी असल्याचं दिसत आहे. यात तिने लिहिले की, ‘मी माझ्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांचे आभार मानते. तुमच्याकडून मिळालेलं खूप सारं प्रेम, समर्थन आणि सांत्वनासाठी खूप आभार!’, असे म्हणत तिने चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि सेलेब्रीटीनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मागील काही दिवसापूर्वी मंदिराने इन्स्टाग्रामवर पतीसोबतचे काही फोटो शेअर करत म्हटले की, ’25 वर्षे एकमेकांना ओळखून आणि लग्नाला २३ वर्षे झाली… पोस्ट शेअर करत पुन्हा मंदिरा पतीच्या आठवणीत भावूक झाली. मंदिराची ही पोस्ट वाचून चाहते देखील दु:खी झाले. अनेकांनी कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. पतीच्या निधनानंतर ती खंभीर राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे पाहून अनेकजण तिचे कौतुक करतात.

महत्वाच्या बातम्या 

IMP